शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

मिरज पॅटर्नचा सत्ताधारी काँग्रेसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:12 IST

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. मिरज पॅटर्नचा फटका काँग्रेसला बसला असून, मिरजेतील काँग्रेसच्या १४ नगरसेवकांपैकी ७ जण भाजप व राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसला साथ देणाऱ्या मिरजेत यावेळी काँग्रेसला इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, विवेक कांबळे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक माजी ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. मिरज पॅटर्नचा फटका काँग्रेसला बसला असून, मिरजेतील काँग्रेसच्या १४ नगरसेवकांपैकी ७ जण भाजप व राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसला साथ देणाऱ्या मिरजेत यावेळी काँग्रेसला इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, विवेक कांबळे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांशीच संघर्ष करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.पालिका निवडणुकीत मिरज नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. गत निवडणुकीत मिरजेतील २४ पैकी १४ जागा इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी या मिरजेतील कारभारी नेत्यांच्या मदतीने काँग्रेसने जिंकल्या होत्या. मिरजेत यश मिळाल्याने पालिकेची सत्ता काँग्रेसला हस्तगत करणे शक्य झाले. मात्र सध्याच्या पालिका निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचनेत मिरजेतील कारभारी नगरसेवकांच्या प्रभागांचा विस्तार झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असून, अतहर नायकवडी, नाजिया नायकवडी, हसिना नायकवडी हे काँग्रेसचे तीन नगरसेवक राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत. सुरेश आवटी, शिवाजी दुर्वे, निरंजन आवटी या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक महादेव कुरणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. नगरसेविका अश्विनी कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विवेक कांबळे, मालन हुलवान हे सुध्दा काँग्रेसपासून फारकत घेण्याची चिन्हे आहेत. यामुळे मिरजेत किशोर जामदार, संजय मेंढे, बबीता मेंढे, बसवेश्वर सातपुते, धोंडुबाई कलगुटगी, बेबीताई मालगावे एवढेच निष्ठावंत नगरसेवक शिल्लक राहणार आहेत.महापालिका निवडणुकीपूर्वी इद्रिस नायकवडी यांच्या संघर्ष समितीच्या झेंड्याखाली मिरजेतील नगरसेवकांचा दबाव गट कार्यरत ठेवण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकत्र आलेले नगरसेवक फुटल्याने संघर्ष समितीचा प्रयोग बारगळला आहे. आरक्षण व नवीन प्रभागरचनेमुळे बसवेश्वर सातपुते व मालन हुलवान यांना नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे. गत निवडणुकीत मिरजेत भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र यावेळी काँग्रेसचे तीन व मनसे व राष्टÑवादीचा एक असे सहा नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मिरजेत झालेल्या सभेत नेत्यांनी गत निवडणुकीत मिरजेत काँग्रेसला मिळालेल्या यशाचा उल्लेख केला होता. नगरसेवकांच्या गळतीमुळे या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.सर्वपक्षीय नगरसेवकांचे परस्परांशी साटेलोटेमिरजेतील नेत्यांनी महापालिकेतील सत्ताधारी नेत्यांना नेहमीच धोबीपछाड दिली आहे. मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचे परस्परांशी साटेलोटे असल्याने प्रभाग समिती चार नेहमीच विरोधकांकडे राहिली आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलण्याच्या मिरजेतील कारभारी नगरसेवकांच्या मिरज पॅटर्नचा फटका मिरजेत काँग्रेसला बसण्याची चिन्हे असून, काँग्रेस उमेदवारांना माजी काँग्रेस नेत्यांशी लढत द्यावी लागणार आहे.मिरजेतील काही नगरसेवकांनी पक्षांतर केले तरी, मिरजेतील महंमद काझी व हाफिज धत्तुरे गटाची काँग्रेसला मदत होणार आहे. मिरजेत किशोर जामदार हे काँग्रेसचे नेते असले तरी, काही नगरसेवक वगळता इतरांचा त्यांच्याशी सवतासुभा आहे.कुंपणावरील नगरसेवक राष्ट्रवादीतून लढणारआ. जयंत पाटील राष्टÑवादी प्रदेशाध्यक्ष झाल्याने राष्टÑवादीला फायदा झाला आहे. इद्रिस नायकवडी गटाने राष्टÑवादीशी सख्य केले आहे. अल्लाउद्दीन काझी व जुबेर चौधरी या कुंपणावर असलेल्या नगरसेवकांनी पुन्हा राष्टÑवादीतूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला थोडेफार बळ आले आहे.